भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वारांना चिरडले   

तिघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला चिरडल्याने तिघांचा मृत्यू झाला. सिल्लोडजवळील लिहाखेडी फाट्यावर ही घटना घडली. समाधान अवचितराव आघाडे (वय ४१), काशिनाथ गोविंदा पांढरे (२५) आणि विकास रामभाऊ सोनवणे (४५) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही भोकरदन तालुक्यातील अनवा गावातून नवरात्रीनिमित्त आजूबाईच्या स्वारीसाठी दुचाकीवरून जात होते. सिल्लोडजवळील लिहाखेडी फाट्यावर भरधाव ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारीला चिरडले. 
 
अपघातात समाधान आघाडे आणि काशिनाथ पांढरे या दोन मित्रांचा जागेवरच मृत्यू झाला. स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य राबवले. सर्वांनाच सरकारी रूग्णालयात नेण्यात आले. तिथे दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर  विकास रामभाऊ सोनवणे याने रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. 
 
अजिंठा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, ट्रॅक्टर जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 

Related Articles